| पनवेल | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महापालिकेने लोकसहभागातून विविध स्पर्धांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना आज दि.5 मे रोजी बुद्धपर्णिमेनिमित्ताने आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्यांना रोख रक्कम व स्मृती चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी उपयुक्त गणेश शेटे, माजी नगर सेवक बिनेदार अनिल भगत, दर्शना भोईर, डॉ.सुरेखा मोहकर तसेच महापालिका अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विविध संघटनेचे सदस्य, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. प्रकाश बिनेदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.