युवा सप्ताहानिमित्त म्हसळ्यात कार्यक्रम

| म्हसळा | वार्ताहर |
स्वामी विवेकानंद सप्ताहानिमित्त म्हसळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा येथे संपन्न झालेल्या सप्ताहानिमित्त गेले आठवडाभर विविध कार्यक्रम सुरु असून कार्यक्रमांची पाचवी माळ गुंफण्याचा मान देण्यात आला. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या दालनाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर, प्राचार्य प्रकाश हाके, पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के, अशोक काते, महेश पवार, श्रीकांत बिरवाडकर, अरुण जंगम आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक काते ,महेश पवार यांनीही मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रकाश हाके यांनी प्रास्ताविक केले.. पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version