| पनवेल | वार्ताहर |
राज्यभरातील 117 पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नत्या दोन महिन्यांपासून रखडल्या आहे. त्या सर्वांची सहायक निरीक्षक पदावर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील ऑर्डर काढलेल्या नाहीत. येत्या काही दिवसांत पदोन्नतींचे आदेश न निघाल्यास बढत्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याच्या शक्यतेने पोलिस चिंतित आहेत. काही वर्षांपासून पोलिसांच्या बदल्या, पदोन्नतीचे आदेश काढण्यात विलंब होताना दिसत आहे. त्यामागचे कारण गुलदस्त्यात असताना पुन्हा एकदा पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश रखडले आहेत. 117 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षक पदावर बढती मिळणार आहे त्यासाठी ऑगस्टमध्ये पदोन्नती समितीची बैठक देखील पार पडली. त्यानंतर 28 डिसेंबरला त्यांचे महसुली संवर्ग वाटप देखील करण्यात आले. परंतु दोन महिने उलटूनही अद्याप पर्यंत प्रत्यक्ष पदोन्नतींची ऑर्डर काढण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील 117 पोलिस उपनिरीक्षकांची पदोन्नत्या रखडल्या आहेत.