। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा जागतिक विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर असणार्या भारताने 97 कोटी 73 लाखांचा टप्पा गाठला असून आगामी काळात शंभर कोटी म्हणजेच एक अब्ज लसीकरणाचे उद्दिष्ट साधत हा विक्रम धुमधडाक्यात साजरा करण्याची जय्यत तयारी केंद्र सरकारने केली आहे.
राष्ट्रीय मोफत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर दहा महिन्यातच भारताने शंभर कोटींचा टप्पा गाठलेला आहे. दररोज सुमारे 11 ते 15 लाख इतके लसीकरण सुरू आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतरच्या अडीचशे दिवसांमध्ये भारताने 83 लाख नागरिकांचे लसीकरण केल्याचे केंद्राने म्हटले आहे.
मोदी सरकारने आता शतकोटी कोरोना लसीकरणाच्या विक्रमाचा सोहळा करण्याची जंगी तयारी केली आहे. ङ्गकोविड अॅपफवर 100 कोटी म्हणजे एक अब्ज लसीकरणाबाबतची उलट गणती दाखवणारे आकडे वेगाने पळत आहेत. ज्यावेळी हा ऐतिहासिक क्षण येईल त्यावेळी त्याची उद्घोषणा देशभरातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, विमानतळे, मेट्रो स्थानके यांच्यावर एकाच वेळी करण्यात येईल. तसेच स्पाइस जेट विमानांमध्ये आरोग्य सेवकांची आणि कोरोना योद्ध्यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत. विक्रमाच्या दिवशी खादी इंडियाने तयार केले मोठमोठे राष्ट्रध्वज नॉर्थ- साउथ ब्लॉक, लाल किल्ला आणि ऐतिहासिक स्मारकांवर फडकाविले जातील.
थकज ची बैठक
स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापराला मंजूरी मिळू शकते. याबाबत डब्लूएचओची महत्त्वाची बैठक येत्या 26 ऑक्टोबरला होणार आहे. ही लस आवश्यक त्या सगळ्या नियमांना खरी उतरतेय अथवा नाही, याबाबत डब्लूएचओचे विशेषज्ज्ञ सध्या पडताळणी करत आहेत. ही लस भारत बायोटेकने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्यामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी सोबत मिळून विकसित केली आहे.