| पनवेल | वार्ताहर |
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमधील एका घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रकम चोरून नेल्याची घटना घडली. श्रीकांत पाटेकर हे न्यू राजहंस सोसायटी, आदई येथे राहतात. ते दरवाजाला कुलूप लावून कामा निमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधत चोराने त्यांच्या घरात प्रवेश करून तेथून 30 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले. पाटेकर हे काम आटपून घरी परतले असता घरात चोरी झाल्याचे त्यांना आढळले. त्यावर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याचा शोध सुरू केला आहे.