रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक
| चणेरा | प्रतिनिधी |
रोह्यात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चालू होती. परंतु तो कुठे आणि कधी चालतो याची चाहूल कोणाला लागत नव्हती. परंतु रोहा पोलिसांना याची चाहूल लागताच, शुक्रवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास रोहा पोलिसांनी सापळा रचून दमखाडी येथील श्रीराम लॉजवर गुप्तपणे धाड टाकली. यामध्ये रोह्यातील वैश्य व्यवसायाचे पितळ उघडे पडले. यामध्ये तीन महिलेसह आरोपीला त्यांनी ताब्यात घेतले.
महिलेला आश्रय देऊन त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता देहविक्री धंदा करण्यास त्यांना भाग पाडले जात होते. दमखाडी येथील श्रीराम लॉजमध्ये पीडित महिलांना आणून देहविक्रीचा धंदा त्याने सुरु केला होता.
याबाबत रोहा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पीडित महिलांची सुटका करून आरोपी संजय हरिश्चंद्र वाघमारे (वय 51,रा. नागोठणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीस अटक केली असून अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर व सहकारी करीत आहेत.