। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये वाहतूक शाखेच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रिक्षा चालक व इको चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, वाहतूक पोलीस कर्मचारी गणेश बोर्हाडे, बाबासाहेब तिडके यांनी कर्जत चार फाटा, श्रीरामपूल, बाजारपेठ आधी ठिकाणी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांच्या पत्रकाचे वाटप केले. तसेच, वाहन चालवताना तोडलेल्या नियमांविषयी व दंडा संदर्भात माहिती दिली.