रसायनीत प्लास्टिक बंदीची जनजागृती

| रसायनी । वार्ताहर ।

रसायनीत प्लास्टिक पिशवी बंदी जनजागृती रॅली आणि कागदी पिशवी वाटप कार्यक्रम शनिवार दि.13 रोजी पार पडला. रसायनी मोहोपाडा पिल्लई महाविद्यालयातून पद रॅलीला सुरुवात झाली. हि पदरॅली मोहोपाडा व नवीन पोसरी बाजारपेठेत फिरवून अरुण जाधव व अमित पाटील यांनी दुकानदारांना पटवून दिले. यावेळी बाजारपेठेतील दुकानदारांना कागदी पिशव्या मोफत वाटप करण्यात आले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक हटवा देश वाचवा, प्लास्टिक हद्दपार करा, पर्यांवरण वाचवा, वंदे मातरम्, भारत माता की जय अशी घोषणाबाजी केली.यावेळी संदीप मुंढे, पोलीस निरीक्षक मुल्ला, डॉ लता मेनन, कलावती उपाध्याय, पिल्लई कॉलेज मोहोपाडा रसायनी पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि एनएनएसचे विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version