| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सेंट मेरी हायर सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबागमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, जंक फूड टाळा, मतदानाचा हक्क बजावा या विषयांवर आधारित अलिबाग शहरात पथनाट्य सादर केले.
स्मार्ट रायगड बाजार, पीएनपी नगर, बसस्थानक, छत्रपती महाराज चौक या ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्यातून जनजागृती करून आजच्या पिढीला व्यसनापासून दूर राहा, हुंडा घेऊ देऊ नका, मतदानाचा हक्क बजावा, जंग फूडच्या आहारी जाऊ नका असा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाला नागरिकांनी भरभरून दाद दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका मा. सिस्टर बेरल आणि शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व कर्मचार्यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.