पोलीस दल, प्रीझमतर्फे पथनाट्यातून जनप्रबोधन

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड पोलीस आणि प्रीतम संस्थेच्यावतीने अलिबाग येथे हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा या पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग पोलीस निरीक्षक सनस साहेब यांसह पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, स्पर्धा विश्‍व अकॅडमीचे विद्यार्थी यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या पथनाट्याचे नेतृत्व तपस्वी गोंधळी करीत असून सदर पथनाट्य मध्ये पूर्वा नाईक, मानसी नागावकर, पार्थ म्हात्रे, सलोनी कोळी, श्रेया पाटील, समृद्धी पाटील, नेहा म्हात्रे, साक्षी पाटील, भाग्यश्री माळवी आदि कलाकार सहभागी झाले होते.

Exit mobile version