समान नागरी कायद्यावर 21, 22 नोव्हेंबरला जनसुनावणी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

समान नागरी कायद्याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात 21 व 22 नोव्हेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित गट, संस्था आणि नागरिकांनी उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून ही सुनावणी होणार आहे. विवाह, घटस्फोट, लिव्ह-इन संबंध, भरण-पोषण, पालकत्व, वारसाहक्क आदी विषयांवर नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ही सुनावणी कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात होईल.

जिल्हानिहाय वेळापत्रक :
21 नोव्हेंबर मुंबई शहर (सकाळी 11 ते 12), मुंबई उपनगर (12.30 ते 1.30), पालघर (दुपारी 3 ते 4), सिंधुदुर्ग (4.30 ते 5.30). 22 नोव्हेंबर ठाण्ो (सकाळी 11 ते 12), रायगड (12.30 ते 1.30), रत्नागिरी (दुपारी 3 ते 4).

नागरिकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात निर्धारित वेळेच्या एक तास आधी उपस्थित राहावे. आयुक्त कार्यालयातील सुनावणी प्रत्यक्ष, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. ऑनलाइन मते नोंदविण्यासाठी शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या पोर्टलवर 37 मुद्द्यांवर माहिती सादर करता येणार आहे.

Exit mobile version