। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
नाडसुर केंद्राची शिक्षण परिषद केंद्र शाळा नाडसुर येथे ता.29 मार्च रोजी संपन्न झाली. यावेळी बहिरमपाडा शाळेच्या बिजांकुरण या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या शिक्षण परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, भाषा व समाज शास्त्र, थोरांची ओळख, माझा नवा उपक्रम, सीसीई मूल्यमापन, तालुका स्तरीय उपक्रम आदि विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शक केले.या आकर्षक, सचित्र व माहितीपूर्ण हस्तलिखित मध्ये विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेल्या कविता, प्रार्थना व लेखांचा देखील समावेश केला आहे. गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, कल्पना पाटील, अनिल राणे, अमोल पाटील, आशा इप्पर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सहकार्याने हे आकर्षक व माहितीपूर्ण हस्तलिखित तयार केले आहे. यावेळी नाडसूर केंद्रातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.