| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच कुर्ला, मुंबई येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व उपक्रमाचे संयोजक संजय साळगावकर, विशेष सहकार्य करणारे कार्यकारी सदस्य सुभाष कोकणे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष सोनंदकर, सल्लागार डॉ. खंडू माळवे व पत्रकार शशिकांत सावंत, कार्यकारी सदस्या माधवी साळगावकर आणि साहित्यिक, कवी विलास देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.







