| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयातील प्रा.राजू गोरुले व प्रा.एल.एन.चोपडे यांनी संयुक्तरीत्या ब्रीज कोर्स इन अकौंटन्सी या पुस्तकाचे लेखन केले. त्याचे प्रकाशन प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी यांचे भहस्ते करण्यात आले.वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या ज्या विद्यार्थ्यांचा अकौन्टन्सी विषयाचा पाया कच्चा आहे अशा विद्यार्थ्यांना यापुस्तकाचा निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन डॉ. एस.व्ही जोशी यांनी प्रकाशनाचे वेळी केले.या समारंभाचे वेळी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.शंकर भोईर यांनी लेखकांचे कौतुक केले.तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी लेखकांचे विशेष अभिनंदन केले.