। अलिबाग । वार्ताहर ।
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समग्र रायगड या कॉफी टेबल बुकच्या ई-बुकचे अनावरण जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपन्न झाले. सोमवारपासून हे कॉफी टेबल बुक नागरिकांकरिता https://raigad.gov.in/samagraraigad/ येथे विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
यावेळी आ.भरत गोगावले, महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
हे कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मीडिया आर अँड डीचे दिलीप कवळी यांचे विशेष सहकार्य लाभले असून कॉफी टेबल बुकचे ई- फ्लिपींग बुक तयार करण्याकरिता राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तांत्रिक संचालक चिंतामणी मिश्रा, अपर जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे, संगणक अभियंता श्रीकांत नवाळे, प्रतिष भोर व योगेश कराड यांनी विशेष परिश्रम योगदान दिले आहे.