बाकड्यावर नाचणार्‍याला खाली खेचा- आदित्य ठाकरे


| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन यांनी वादळ निर्माण केले आहे. त्यामुळे बाकड्यावर नाचणार्‍याला खाली खेचा, मशाल जिंकून आणा, असे आवाहन शिवसैनिकांना केले. महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेला महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यात मुस्लिम धर्मीय यांनी मोठी गर्दी केली होती.

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन सावंत यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती. खोपोली शहरातील आंबेडकर स्मारक येथे आयोजित केलेल्या सभेलामोठी गर्दी जमली होती. शिवसेना उपनेते आ. सचिन अहीर, उमेदवार नितीन सावंत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, कम्युनिस्ट पक्ष जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. गोपाळ शेळके, काँग्रेस ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे, शकील कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुका अध्यक्ष, सेनेचे खोपोली शहराध्यक्ष मोरे आदी उपस्थित होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी मतदारांना आवाहन करताना टेबलावर चढून नाचणारा पाहिजे का? हे ठरविण्याची वेळ आली आहे, हातवारे करून नाचणारे आपले होणार नाहीत, ठेकेदार, दादागिरी, गुंडाचे राज्य, धमकावले तर जशास तसे उत्तर देऊ. मुंबई अदानीच्या खशात घातले आहे. एक हजार एकर जमीन लाटणारे अदानी हे उद्या येथे गुजरात किंवा अदानीचे राज्य आणतील, अशी टीका केली. बाकड्यांवर नाचणार्‍या आमदाराला त्याची जागा दाखवून रायगडला लागलेला गद्दारीचा कलंक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पुसून काढतील असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version