पाणी उपसण्यासाठी 84 ठिकाणी पंप

। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।

पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना कमी व्हाव्या या करता सज्ज असलेल्या पालिका प्रशासनाकडून पालिका हद्दीत 84 ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी देखरेख करण्यासाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात पालिका हद्दीत विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडत असल्याने तुंबणारे पाणी वाहून नेण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने विशेष उपाय योजना करण्यात येत असतात. या करता अनेक ठिकाणी डीझेलवर चालणारे पाणी उपसा करणारे पंप पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करुण देण्यात येत असतात. यंदा देखील पालिका प्रशासनकडून पालिका हद्दीतील चारही प्रभागात पाणी तुंबणार्‍या ठिकाणी उपसा करणारे पंप बसवण्यात आले आहेत.

Exit mobile version