पर्यटकांचा हिरमोड! कुंडलिका नदीवरील राफ्टिंग बंद

| कोलाड । वार्ताहर ।
जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रोहा व सुधागड तालुक्यांत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या आदेशाने जमावबंदी सूचनेचे पालन व्हावे म्हणून कुंडलिका नदी किनार्‍यावरील डव्हेंचर सेंटरवरील राफ्टिंग बंद करण्याची नोटीस कोलाड पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी रविवारी राफ्टिंग बंद केले आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.

Exit mobile version