ग्रामविकास अधिकारी रघुनाथ म्हात्रे सेवानिवृत्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वेश्‍वी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रघुनाथ म्हात्रे सेवानिवृत्त झाले. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला. रघूनाथ म्हात्रे 1985 साली ग्रामविकास खात्यामध्ये नोकरीला लागले. सुरुवातीला ते ग्रामसेवक म्हणून माणगाव तालुक्यातील मांजरोणे, त्यानंतर खालापूर तालुक्यातील वावर्ले, बोरगाव, वरोशे, माडण, माजगाव, इसांबे, सावरोली, कुंभीवली येथील ग्रामपंचायतीमध्ये काम केले. त्यानंतर त्यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून बढती झाली. अलिबाग तालुक्यातील खंडाळे व वेश्‍वी या ठिकाणी त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला. या खात्यामध्ये 36 वर्षे सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी हागणदारी मुक्त गाव, तसेच अनेक ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळवून दिले. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये वेगवेगळ्या शासकिय योजना राबवून तळागाळाती घटकाचा विकास साधला असून वेगवेगळ्या योजनेतून गावे व वाड्यांचा विकासदेखील साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अलिबाग पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी डी. एल. साळावकर, डी. बी. राठोड, एन. टी. म्हात्रे, नितेश तेलगे आदी उपस्थित होते.

Exit mobile version