सामना संपल्यानंतर के एल राहुलने एका घटेबद्दल प्रतिक्रिया दिली आणि कर्णधार म्हणून स्वत:ची चूक कबूल केली. सामन्यादरम्यान राहुलला त्याच्या साथीदार खेळाडूने फेकलेला चेंडू लागला होता. या घटनेची दखल घेत राहुलने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, माझ्या साथीदाराचा थ्रो मला लागला, त्यावेळी मला समजलं की कर्णधार म्हणून मी काहीतरी चुकीचं करत आहे. आम्ही 160 च्या टार्गेटबद्दल विचार करत होतो पण असं झालं नाही. त्यांनी शानदार गोलंदाजी केली. आम्ही 10 धावा कमी केल्या पण गोलंदाजांनी त्याची भरपाई केली. या मैदानात दव नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी होत्या. आम्ही काल सामना खेळला आणि पाहिलं की, इथे 180 धावसंख्या पार होऊ शकते. परंतु बोल्टच्या पहिल्या षटकात मी आणि केली मायर्सने चर्चा केली. त्यावेळी आम्हाला समजलं ही 180 धावांची खेळपट्टी नाहीय. चेंडू थोडा खाली राहत होता. त्यामुळे आम्ही पॉवर प्ले मध्ये थोडा वेळ दिला. आम्ही अजून चांगलं प्रदर्शन केलं असतं, तर 170 धावा करू शकलो असतो.असेही तो म्हणाला.







