सामना संपल्यानंतर के एल राहुलने एका घटेबद्दल प्रतिक्रिया दिली आणि कर्णधार म्हणून स्वत:ची चूक कबूल केली. सामन्यादरम्यान राहुलला त्याच्या साथीदार खेळाडूने फेकलेला चेंडू लागला होता. या घटनेची दखल घेत राहुलने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, माझ्या साथीदाराचा थ्रो मला लागला, त्यावेळी मला समजलं की कर्णधार म्हणून मी काहीतरी चुकीचं करत आहे. आम्ही 160 च्या टार्गेटबद्दल विचार करत होतो पण असं झालं नाही. त्यांनी शानदार गोलंदाजी केली. आम्ही 10 धावा कमी केल्या पण गोलंदाजांनी त्याची भरपाई केली. या मैदानात दव नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी होत्या. आम्ही काल सामना खेळला आणि पाहिलं की, इथे 180 धावसंख्या पार होऊ शकते. परंतु बोल्टच्या पहिल्या षटकात मी आणि केली मायर्सने चर्चा केली. त्यावेळी आम्हाला समजलं ही 180 धावांची खेळपट्टी नाहीय. चेंडू थोडा खाली राहत होता. त्यामुळे आम्ही पॉवर प्ले मध्ये थोडा वेळ दिला. आम्ही अजून चांगलं प्रदर्शन केलं असतं, तर 170 धावा करू शकलो असतो.असेही तो म्हणाला.
राहुलकडून चूक कबूल
-
by Krushival

- Categories: क्रीडा, देश
- Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews indiaonline marathi newsraigad
Related Content
भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू
by
Antara Parange
June 17, 2026
थेट कफ सिरप विक्रीवर बंदी
by
Sanika Mhatre
June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
by
Antara Parange
June 16, 2026
भारत-श्रीलंका सामन्यात राडा!
by
Antara Parange
June 16, 2026
वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी
by
Antara Parange
June 15, 2026
Women's T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी
by
Antara Parange
June 15, 2026