| धाटाव | वार्ताहर |
रोहा तालुक्यात गेली काही दिवसांपासून गावठी दारूची आयात निर्यातिच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. रोहा तालुक्यातील निवी आदिवासी जंगल परिसरात गावठी दारूच्या हातभट्टीवर रोहा पोलिसांनी पहाटे छापा घातला. या टाकलेल्या छाप्यात 1200 लिटर दारुसाठ्याच्या रसायनासहित अंदाजे 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
यावेळी दोन ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयारीचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी जागेवर उदध्वस्त केला. यामधे बाराशे लिटर गूळ नवसागर मिश्रित तयार रसायन, 6 लोखंडी व प्लास्टिक ड्रम,साहित्य अंदाजे 55 हजार रुपयांचा माल उदध्वस्त केला. कारवाई दरम्यान कोणीही व्यक्ती हाती लागली नाही. ही कारवाई पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक येदाळे, हनुमंत धायगुडे यांसह कर्मचार्यांनी केली. संबधित कारवाईचे सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.