14 कोरोनामुक्त, 73 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरूवार दि. 19 मे रोजी पनवेल मनपा हद्दीत सहा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 73 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आज पनवेल मनपा हद्दीत सहा नवीन रूग्ण आढळले तर पनवेल मनपा हद्दीतीलच 14 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 436 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 665 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर थांबला आहे. सद्यस्थितीत 73 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.