रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेत उरणचा अजित म्हात्रे ठरला रायगड श्री 2022

गोकुळ कुँवर रायगड फिजिक 2022, भुषण सुभाष माळी रायगड श्रीमान 2022
। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व भाई नित्यानंद म्हात्रे पुरस्कृत जिल्हास्तरीय हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा रायगड श्री 2022, रायगड फिजिक2022 व रायगड श्रीमान 2022 शनिवारी (दि.26) कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन करून आवरे, कोप्रोली, उरण येथे मोठ्या थाटामाटात पार पडल्या. रायगड हेल्थ सेंटर, उरणचा अजित वामन म्हात्रे रायगड श्री 2022 चा मानकरी ठरला. बेस्टपोझरचा सन्मान कान्होबा जिम, उरणचा शुभम परशुराम म्हात्रे याला मिळाला.
नित्यानंद म्हात्रे, अभिजित पाटील, प्रभाकर म्हात्रे अन्य मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. पंच म्हणून सुरेंद्र महाडिक, भगवान सावंत, जितेंद्र गुरव, विक्रांत पाटील, सुरेश परदेशी,परेश मोकल, संतोष साखरे व नितीन घरत यांनी काम पाहिले. स्पर्धेचे गुणलेखन परेश मोकल, महेश रुईकर यांनी केले. स्पर्धेचे सुत्रसंचलन संतोष साखरे तर स्टेज मार्शल म्हणून श्री जितेंद्र म्हात्रे व दिपक शिंदे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत रायगड श्री 2022 पहिल्या गटात प्रथम हनुमान राघू भगत, तुषार फिटनेस पनवेल, दुसर्‍या गटात प्रथम अजित वामन म्हात्रे, रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली, तिसर्‍या गटात प्रथम संकेत संजय वर्तक, रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली उरण, चौथ्या गटात प्रथम प्रसाद चंद्रकांत सुतार, गुरुकुल व्यायाम शाळा अलिबाग तर रायगड फिजिक 2022 पहिल्या गटसत प्रथम अनिकेत पाटील, आर अँड जे फिटनेस मोठीजुई उरण, दुसर्‍या गटात प्रथम गोकुळ नरेश कुँवर, वनलाईफ फिटनेस पनवेल व रायगड श्रीमान 2022मध्ये प्रथम भुषण सुभाष माळी, पावर हाऊस जिम उरण यांनी बाजी मारली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ नित्यानंद म्हात्रे यांच्या समवेत, अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडला. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड हेल्थ सेंटर कोप्रोलीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version