अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने नित्यानंद म्हात्रे आवरे, कोप्रोली, उरण पुरस्कृत रायगड जिल्हा हौशी अजिंक्यपद स्पर्धा रायगड श्री 2022, रायगड श्रीमान 2022 (40 वर्षावरील स्पर्धकांसाठी) तसेच रायगड फिजिक 2022 या स्पर्धां शनिवार दि.26 मार्च2022 रोजी सायं 4.00 वाजल्यापासून रा.जि. प. प्राथमिक शाळा आवरे प्रांगण, कोप्रोली, उरण, जिल्हा रायगड येथे संपन्न होणार आहेत.
प्रत्येक उंची गटात 1 ते 5 क्रमांकांना रोख बक्षिसे ट्राँफी व सर्टिफिकेट भाग घेणार्या स्पर्धकांनी आपला आधार कार्ड, झेरॉक्स प्रत बरोबर आणणे आवश्यक आहे.संपूर्ण स्पर्धा व सहभाग संघटनेच्या नियमांनुसार असणार आहेत. फी. प्रति स्पर्धक रु. 100 राहिल. तरी रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शरीरसौष्ठव पटुंनी या स्पर्धांत भाग घ्यावा असे आवाहन आयोजक व संघटनेतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संतोष साखरे 9421164084 यांना संपर्क साधावा.