| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँको पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बँकेने दरवर्षी हा पुरस्कार वेगवेगळ्या प्रकारामध्ये पटकाविलेला असून पुरस्कार प्राप्त करण्याचे बँकेचे हे सलग सातवे वर्ष असणार आहे. बँको या देशपातळीवरील नामांकित संस्थेकडून देशपातळीवर सहकारी बँकांचे मूल्यमापन करून उल्लेखनीय कामगिरी करणा़़र्या बँकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. यामध्ये बँकेचा व्यवसाय, प्रतिसेवक उत्पादकता, संगणकीकरण, वर्ग, कर्जवसुली, वार्षिक व्यवसाय वृद्धी, उत्तम व्यवस्थापन आणि प्रशासन या निकषांच्या आधारे 2000 ते 5000 कोटी व्यवसाय असणार्या विभागामध्ये मूल्यमापन करून हा पुरस्कार दिला जाणार आहे.
रायगड जिल्हा सहकारी बँकेने मागील काही वर्षामध्ये ई-कॉमर्स सेवा, युपीआय पेमेंट, मोबाइल बँकिंग अशा अत्याधुनिक सेवा सुरु केलेल्या आहेत. तसेच नुकतेच बँकेने आपल्या .लेा या वेबसाईट मध्ये अद्ययावत बदल घडवून वेबसाईट ग्राहकोपयोगी बनविण्यात आली आहे. मा.पंतप्रधान यांनी देशाला डिजिटलायजेशनचा पुरस्कार करण्याचे आवाहन जनतेला केले असताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यामध्ये योगदान म्हणून बँकेने जिल्ह्यामध्ये विविध शाखांमध्ये एटीएमची उभारणी करून बँकेच्या ग्राहकांना एटीएम, केसीसी कार्डचे वाटप करून कॅशलेस बँकिंगचा प्रचार-प्रसार करण्याचे काम घेतले आहे.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नेहमीच आधुनिक कार्यप्रणाली राबवीत असते ज्यामध्ये नुकतेच बँकेने बँकेला सलंग्न असणार्या सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचे काम बँकेने पूर्ण केलेले असून त्यामुळे या सर्व सहकारी संस्थांचे कामकाज अधिक गतिमान आणि व्यवस्थित होणार आहे. बँकेला मिळणारे पुरस्कार हे बँकेने आपल्या आणलेली आधुनिकता तसेच जयंत पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांचे बहुमुल्य मार्गदर्शन आणि बँकेमधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य, सर्वोत्तम ग्राहकसेवा या सर्वांचा एकत्रित परिणाम असल्याचे वर्तक यांनी नमूद केले. तसेच या पुरस्काराचे श्रेय बँकेचे चेअरमन आ.जयंत पाटील, बँकेचे संचालक यांच्याबरोबरच सर्व कर्मचारी आणि विशेषकरून बँकेबरोबर सदैव असणारे यांना जाते असे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आवर्जून सांगितले.
बँकेला वर्षांपेक्षा अधिक काळ ऑडीट मध्ये अ वर्ग मिळत आलेला आहे. 20,000 पेक्षा अधिक बचतगटाच्या माध्यामतून महिला सक्षमीकरण करण्यात आले आहे. नवीन व्यवसाय उभारणीसाठी मायक्रो फायनान्स सुरु आहे. वि.का.सह.संस्थांचे बँकेच्या खर्चातून संगणकीकरण केले जात आहे.शिवाय शेतकर्यांना तात्काळ दिले जात आहे. – आ.जयंत पाटील- चेअरमन
बँकेने नुकतेच आपला 4300 कोटींचा व्यवसाय पार केला असून लवकरच बँकेच्यावतीने 5000 कोटींचा व्यवसाय पूर्ण करणार आहे. बँकेचा स्वनिधी देखील 500 कोटींच्या पुढे असून मागील 15 वर्षांपासून बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असणारी अग्रगण्य बँक असणारी ओळख हे आमच्या बँकेचे सामर्थ्य आहे. – वर्तक- मुख्य कार्यकारी अधिकारी