• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार?

Antara Parange by Antara Parange
May 2, 2025
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार?
0
SHARES
147
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अडीच-अडीच वर्षांचा कालावधी पदरी पडणार?

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महायुतीतील कोणत्या राजकीय पक्षाच्या झोळीत पडणार असा असणारा संभ्रम लवकरच दूर होण्याचे संकेत मिळाले आहेत. पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने बाजी मारल्याचे राजकीय सूत्रांच्या महितीमुळे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय डावपेचासमोर शिंदे गटाचे नेते अपयशी ठरल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील पालकमंत्रिपदाचा तिढा महायुतीच्या पक्ष श्रेष्ठींनी सोडविला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्रीपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. पहिले अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये अदिती तटकरे यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी असेल तर नंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीत रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रिपद सोपवले जाणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.

सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा सुटण्याचे संकेत मिळाले आहेत. कारण महाराष्ट्रदिनी रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार हे निश्‍चित झाले. त्यामुळे हा प्रश्‍न सुटल्याचे दिसते.राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आले. त्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या शासकीय ध्वजवंदनासाठी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, रायगडसाठी शिंदेंचे शिलेदार भरत गोगावले हे इच्छुक आहेत. ध्वजवंदन करण्याची संधी दिली म्हणजे पालकमंत्रिपद दिले असे होत नाही असे म्हणत नाराजी व्यक्त करणार्‍या नेत्यांची तोंडे आता बंद होणार आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर कुणाची वर्णी लागते यांची चर्चा सुरु असताना आदिती तटकरे यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आले. नंतर पालकमंत्रीही जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदी नेमण्यात आले होते. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेच्या जोरदार विरोधामुळे त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. आदिती तटकरे यांनाच पुन्हा पालकमंत्री करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोर लावला जात आहे, तर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळावे यासाठी शिंदे सेना आग्रही आहे.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर तटकरे नको असा रेटा अनेकदा लावला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा घटक पक्ष नसतानाही तटकरेंच्या पालकमंत्री पदावर रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी जाहीर केली असल्याचे सर्वश्रुत आहे. फरक इतकाच तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. आणि त्यावेळी शिवसेना एकत्रित होती. त्यानंतर शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि शिंदे शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली आणि शिंदे गटाला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे स्वप्न पडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी झाली. राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजप शिंदे गट यांच्यासोबत सत्तेत सामील झाला आणि शिंदे गटाचे पालकमंत्रिपद मिळविण्याचे स्वप्न भंगले. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या कुठल्याही आमदाराला मंत्रिपदाची बोलावणं आला नाही. मात्र, अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजीचाकळस पाहावयास मिळाला. त्यानंतर भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. यामुळे आता पालकमंत्रिपदाचामार्ग सुकर झाला असे शिंदे गटाच्या रायगड जिल्ह्यातील नेत्यांना वाटले. मात्र तटकरेंच्या असणार्‍या गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या राजकीय फिल्डिंगमुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ गळ्यात घालणे शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना अजूनतरी जमले नाही. पालकमंत्रिपद तटकरे कुटुंबाकडे गेले तर राजकीय पलटवार करण्याच्या तयारीत रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार आहेत असे अनेकदा त्यांनी आपल्या भाषणांमधून बोलून दाखवले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला गेले होते . त्यामुळे अमित शहा यांच्या या दौर्‍यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. अमित शाह येऊन गेल्यानंतर आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या तिढा वरिष्ठांनी सोडविलाआहे. यामध्ये अडीच आधीचवर्षे पालकमंत्री पद भूषविण्याचा फार्म्युला ठरविण्यात आला आहे. यामध्ये पालकमंत्रिपदाचा पहिला मान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना तर नंतरची अडीच वर्षे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना देण्यात येणार असल्याचे ठरले आहे.

Related

Tags: aditi tatkarebharat gogavaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadRaigad Guardian Ministershipsocial media newssocial news
Previous Post

भारत, पाकिस्तान युद्ध अटळ?

Next Post

आरोग्य कर्मचारी मानधनाविना

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
Next Post
आरोग्य कर्मचारी मानधनाविना

आरोग्य कर्मचारी मानधनाविना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?