• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

सहकार चळवळीत रायगड अग्रेसर

Antara Parange by Antara Parange
January 31, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
सहकार चळवळीत रायगड अग्रेसर
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काकासाहेब कोयटे यांचे गौरवोद्गार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सहकार चळवळ वाढविण्यासाठी जिल्हा बँकेबरोबरच वेगवेगळ्या पतसंस्था, सहकार संस्थांनी योगदान दिले आहे. युनो ने 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्ताने राज्यात सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यासह कोकणात अलिबागपर्यंत ही दिंडी काढण्यात आली आहे. पतसंस्थाच्या चळवळीला जोश निर्माण व्हावा, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. सहकार चळवळीतील कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार चळवळीत रायगड जिल्हा अग्रेसर राहिला आहे. आंतरराष्ट्रीय दिनासाठी सर्व पतसंस्था, सहकार संस्थांची मदत होत असल्याचा आनंद आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी काढले.


महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड यांच्यावतीने अलिबागमध्ये सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शुक्रवारी(दि.31) ते बोलत होते.

यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपकार्यवाह सुरेश पाटील, गिरीष तुळपूळे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप व अन्य पदाधिकारी, सहकार चळवळीतील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोयटे म्हणाले की, सकल राष्ट्रीय उत्पन्नात सहकाराचा वाटा 24 टक्के आहे. पतसंस्थांच्या अनेक समस्या आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांची गरज पुर्ण करण्यासाठी पतंससंस्था, व सहकाराचे योगदान राहिले आहे. सहकाराबाबत अविश्‍वासाचे वातावरण आहे, ते दुर करण्याबरोबरच सहकारात महिला व युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी राज्यात दोन ठिकाणी सहकार दिंडी सुरु करण्यात आली आहे. दुसरी दिंडी मुंबईतून काढण्यात आली आहे. कोकणासह अलिबागपर्यंत ही दिंडी असणार आहे. या सहकारी दिंडीचा समारोप शिर्डी येथे सहकार परिषदेच्या निमित्ताने होणार आहे. या आंतरराष्ट्रीय दिनासाठी रायगड जिल्हयातून हजारो सहकार चळवळीतील कार्यकर्ते सामील राहतील असा विश्‍वास आहे. सहकार चळवळीत जिल्ह्याचे योगदान मोलाचे राहिले आहे. सहकार चळवळ वाढविण्यासाठी जिल्ह्याने प्रचंड मेहनत घेतली आहे, असे कोयटे म्हणाले. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांच्यासह सुरेश पाटील, गिरीष तुळपुळे आदी मान्यवरांनीदेखील आपले मत व्यक्त केले.

सहकार दिंडीने अलिबाग बहरला
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने अलिबागमध्ये सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हयातील सर्वच पतसंस्थांमधील पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचार्‍यांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी सहकार चळवळीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी एक वेगळा उत्साह निमित्ताने पहावयास मिळाला. सहकार दिंडीने संपुर्ण परिसर बहरून गेला होता.

Related

Tags: alibagalibag newsco-operative movementindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगडच्या हवालाकांडाचा शोध सुरु

Next Post

औषध पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

Antara Parange

Antara Parange

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
अलिबाग

वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांवर दांडक्याने हल्ला

February 13, 2026
Next Post
औषध पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

औषध पाजून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?