| अलिबाग | वार्ताहर |
डाक विभागाच्या कुटुंब निवृतीवेतनधारक व निवृत्ती वेतनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रिजन यांच्यामार्फत पेन्शन अदालत शुक्रवारी 16 सप्टेंबरला दुपारी 12 पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, दुसरा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफीस इमारत पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या पेन्शन अदालतीचा हेतू पेन्शन धारकांच्या समस्या वेगवान व प्रभारितीने विनाविलंब सोडवणे हा आहे. या डाक अदालती मधून डाक विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांना असणार्या समस्यावर, तक्रारीवर जागेवरच निर्णय घेऊन तोडगा काढण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तक्रारदारांनी आपला अर्ज दिलेल्या माहिती नुसार वरिष्ठ लेखा अधिकारी, पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई रिजन कार्यालय, दुसरारा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत पनवेल, ता.पनवेल, जि. रायगड 410206 या पत्त्यावर दि.26 ऑगस्ट 2022 पर्यंत मिळतील अशा रीतीने पाठवावेत,असे आवाहन रायगड जिल्हा डाक अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी केले आहे.