। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड पोलीस मुख्यालय अलिबाग येथे दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस मुख्यालय, विसावा परिसर व पोलीस लाईन येथे पडलेला प्लास्टिक तसेच इतर कचरा एकत्र करण्यात आला व प्लास्टिक पुनःप्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर तसेच रायगड पोलीस व अधिकारी उपस्थित होते. आरपीआय प्रकाश मोकल व आरपीआय जुनेद शेख, गुरव हे उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन करत स्वच्छता मोहीम पूर्ण करून घेतली.
माणुसकी प्रतिष्ठानकडून अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, तानाजी आगलावे, नवनाथ गावडे व संपर्कप्रमुख अॅड. भूपेंद्र पाटील उपस्थित होते. यानंतर पाच किलोमीटर पोलिसांची दौड पूर्ण करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देत लोकांनी प्लास्टिक वापर करू नये किंवा वापरत असाल तर त्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. आरपीआय प्रकाश मोकल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रायगड पोलीस मुख्यालय झाले प्लास्टिकमुक्त
