। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी आरटीएसच्या माध्यमातून रत्नाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीपासून शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी या हेतूने रायगड टॅलेंट सर्च कार्यरत आहे. 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सराव परीक्षेची पूर्वतयारी व्हावी या हेतूने 17 ऑक्टोबर 2024 रोजी सुधागड तालुक्यात पाली बीट, जांभूळपाडा बीटमधील विद्यार्थ्यांना पाली नंबर 1 शाळेत व जांभूळपाडा हायस्कूल या ठिकाणी एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात पाली बीटात जनार्दन भिलारे, सतिश खानेकर, राजेंद्र अंबिके, राम संकाये, राकेश गदमले यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. जांभूळपाडा बीटात आनंदा पाटील, अमोल ठोकळ, प्रवीण धारकुंडे, दिक्षा दुधेले यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या शिबिरास वरिष्ठ विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आरटीएस जिल्हा संचालक अनिल राणे, जनार्दन भिलारे, परळी केंद्रप्रमुख हाके सर तसेच सर्व आरटीएस टीम सुधागड यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरात सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, विस्तार अधिकारी नवनाथ साबळे, आरटीएस संचालक अनिल राणे, जनार्दन भिलारे यांनी अभिनंदन केले.
आरटीएस उपक्रमामुळे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पूर्वतयारी होऊन विद्यार्थ्यांना पाचवीमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी नक्कीच मदत होईल. रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये उपक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा टॅलेंट सर्च असोसिएशन खूप मेहनत घेऊन काम करत आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांचा प्रतिसाद उत्कृष्ट मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा या उपक्रमातून होण्यास मदत होईल.
– अनिल राणे, मुख्याध्यापक-शाळा नवघर,
आरटीएस जिल्हा संचालक