| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पुणे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगडने आपल्या गटातील दुसर्या साखळी सामन्यात अँम्बीशीअस संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय प्राप्त करत सलग दुसर्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून अँम्बीशीअस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रायगड संघाने आपल्या डावात 300 धावा केल्या. रायगडच्या स्मित पाटीलने सर्वाधिक 75 धावा केल्या. त्याला सर्वेश ऊलवेकर (72), (86), कर्णधार ओम म्हात्रे (42), क्रिश पाटील (37), अमेय पाटील (30) यांनी चांगली साथ दिली.
अँम्बीशीअस संघाने पहिल्या डावात 271 धावा केल्या. त्यांच्या श्रावण करोल याने फलंदाजाने 98 धावा केल्या. त्यांच्या गौतम पुटगे व ओमकार जाधव यांनी नवव्या गाड्या करता 123 चेंडूत 78 धावांची भागीदारी केली. परंतु, अमेय पाटील याने गौतम पुटगेला 36 धावांवर धावचीत करत ही भागीदारी तोडली. रायगडला पहिल्या डावात 29 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीच्या जोरावर या सामन्यात विजय प्राप्त केला. रायगडने हिंगोली विरुद्ध निर्णायक विजय मिळवला व अँम्बीशीअस विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय, असे दोन सलग विजय प्राप्त केले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व सभासदांनी रायगड संघाचे अभिनंदन केले. रायगडचा गटातील तिसरा साखळी सामना एमसीव्हीएस विरुद्ध 29 व 30 मे रोजी होईल.