। मुंबई। वार्ताहर ।
दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर मनसे यंदा गुढी पाडवा जल्लोषात साजरा करत आहे.हिंदुत्वाची कास धरलेले राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसैनिकांना राज ठाकरेंच्या आजच्या तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या वेळी वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. मात्र यावेळी बोलता बोलता राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असा थेट इशारा दिला होता. त्यामुळ या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याच सोबत आज राज ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख देखील घोषित करण्याची शक्यता आहे