| सुधागड-पाली | वार्ताहर |
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (दि. 2) रोजी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांनी बल्लाळेश्वराचे मनोभावे पूजन केले. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
ठाकरे कुटुंबियांचे कुलदैवत असलेल्या कोंडजाई देवीचेदेखील राज ठाकरे यांनी सोमवारी दर्शन घेतले. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे सोमवारी सकाळी पालीत दाखल झाले. ठाकरे यांचा हा खासगी दौरा असल्याचे मनसे पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले. यावेळी मनसेचे रायगड जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील, सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.