| रायगड | खास प्रतिनिधी |
कोकण विभागीय आयुक्तपदी राजेश देशमुख यांची बदली झाली आहे. त्यामुळे आता कोकण विभागाला पूर्ण वेळ आयुक्त लाभला आहे. राजेश देशमुख हे याआधी आयुक्त, क्रीडा व सेवा या पदावर कार्यरत होते. सध्य्याच्या पदाचा कार्यभार क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या सल्ल्याने अन्य अधिकार्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार विकास पानसरे यांच्याकडून त्वरित स्वीकारवा, असे अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.