प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत ‘लेक शिवबा’ची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील भैरवनाथ मंडळ पेझारी मैदानावर मंगळवारी (दि. 1) सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषद मतदारसंघ कुर्डूस व शहापूर विभागीतल महिलांसाठी हा मेळावा भरविला जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांच्याकडून उपस्थित महिलांना संबोधित केले जाणार आहे. या मेळाव्यात प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.