| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील संभे गावचे रहिवासी तथा रिक्षा व्यावसायिक राजेश महादेव सानप यांचे मंगळवार, दि.26 ऑक्टो. रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, चार बहिणी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून, त्यांचे दशक्रियाविधी व अंतिम धार्मिकविधी गुरू. दि. 4 नोव्हेंबर रोजी संभे येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.