| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांची 78 वी जयंती पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित पांडुरंग पाटील यांच्या उपस्थितीत पनवेल काँग्रेस भवन येथे साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास काँग्रेसचे जेष्ठ नेते शशिकांत बांदोडकर, पनवेल शहर ब्लॉक अध्यक्ष लतीफ शेख, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अमित दवे, प्रताप गावंड, नित्यानंद म्हात्रे, सुधीर मोरे, पनवेल शहर युवक अध्यक्ष राकेश जाधव, देवेंद्र चोरघे अतुल पटेल, तौसीफ बागवान, मनोज शिंदे, आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.