मुक बधीर शाळेत रक्षाबंधन

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील चिंचलवली येथे असलेल्या मुक बधीर विद्यार्थ्यांच्या शाळेत रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला. नेरळ येथील विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी मुकबधीर विद्यार्थ्यांना रक्षाबंधन करून त्या विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम करून सणाचा आनंद घेतला. चिंचवली येथे 26 विद्यार्थी रहिवास करून आहेत, ते आपल्या कुटुंबापासून आणि समाजापासून लांब असलेल्या विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम, यशस्विनी सहस्रबुद्धे, रेखा काळे, कल्पना डांगरे यांनी हा सण विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.

Exit mobile version