रमजान ईद सर्वत्र होणार साजरी !

| माणगाव | प्रतिनिधी |

ईद- ऊल – फित्र म्हणजेच रमजान ईद उद्या गुरुवार (दि.11) एप्रिल रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. इस्लामी शाबान महिन्यानंतर पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ होतो. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे (उपवास) धरीत असतात. तसेच नमाज पठण व कुराण वाचनावर तसेच जकात देणे. (दानधर्म करणे) यावर मुस्लिम बांधवांचा जास्त भर असतो. या महिन्यात रात्रीची इशाची नमाज झाल्यावर तरविहची विशेष नमाज मुस्लिम बांधव अदा करतात. मशीद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईदची सामुदायिक नमाज अदा करणार आहेत. यावर्षी बुधवार (दि.10) एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाल्याने उद्या गुरुवार (दि.11) एप्रिल रोजी रमजानची ईद साजरी केली जाणार आहे. या रमजान ईदची सामुदायिक नमाज गुरुवारी माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील जामा मशिदीत सकाळी 8 वाजता होणार असल्याची माहिती येथील मस्जिद मोहल्ल्याचे अध्यक्ष अब्दुलरहिमन हाजीते दिली.

Exit mobile version