| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या तहव्वुर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. त्याला न्यायाचा सामना करावा लागेल, असं ट्रम्प म्हणाले. मागच्या महिन्यात तहव्वुर राणाचे भारताला प्रत्यर्पण करण्यास अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. पाकिस्तानी वंशाचा कॅनडाई बिझनेसमन तहव्वुर राणाने 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.