अलिबागः रणवीर सिंग रमला क्रिकेट खेळात

| अलिबाग | प्रतिनिधी |

हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग याने अलिबागचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या सातीर्जे येथील निवासस्थनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. रणबीरचे आगमन होताच ठाकूर कुटुंबियांकडून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्राची ठाकूर आणि कटुंबातील महिलांनी त्याचे औक्षण केले.

यावेळी स्व. मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, त्यांचे मोठे बंधू रवी उर्फ नाना ठाकूर, मालती ठाकूर, मीनाक्षी ठाकूर, कळल ठाकूर आणि ठाकूर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

राजाभाऊ ठाकूर यांचे थोरले बंधू ॲड. प्रवीण ठाकूर यांची मुलगी धनश्री ठाकूर हिच्या वाढदिवसानिमित्ताने यावेळी केक कापण्यात आला होता. त्या आनंदातही रणबीर सहभागी झाला. एक आघाडीचा अभिनेता असूनही त्याचे वावरणे हे सर्वांना आपलेसे करणारे होते. सर्वांबरोबर हास्य विनोदात काही क्षण रमल्यानंतर रणबीरला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. गावातील मुलांसोबत त्याने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्याने उत्तम फलंदाजी केली. अभिनयासोबत तो चांगला क्रिकेट खेळतो, हेदेखील त्याने दाखवून दिले.

Exit mobile version