। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिसेगाव येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. वारंवार शारीरिक अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर कर्जत पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे 2020 ते 26 ऑक्टोबर 2021 या दरम्यान कर्जत शहरातील मुद्रे येथील प्रथमेश हाऊस येथील तिघांनी संगनमत करून आरोपी एक याने कर्जत भिसेगाव येथील महिला फिर्यादी यांच्याशी लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिचा गर्भपातही केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसात तक्रार नोंदविली.
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
