। मुंबई । प्रतिनिधी ।
नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर जाळल्यानंतर मोठा राडा झाला. दोन गट आमने-सामने येत दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या नागपूर हिंसाचारावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपाचे कधीच शौर्याचे आणि विजयाचे प्रतिक नव्हते. महाराष्ट्रातील जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे. तसेच, आम्ही वारंवार सांगत आहोत आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे ते प्रतिक आहे. औरंगजेब आला, अफझलखान, शाहिस्तेखान आला आणि परत गेला नाही. मावळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी त्यांची कबर येथेच खणली, हे शौर्याचे प्रतिक आहे. परंतु, ठडड संघाची विचारधारा अशी आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करायचे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
तसेच, दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रात संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केले. राजापुरात काय केले? होळीसारख्या सणाला महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील. औंरगजेबाची ढाल करून काही लोक दंगली करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबरीचे उदाहरण देत आहेत, बाबरीप्रमाणे आम्ही औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करत आहोत. सरकार तुमचे आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.