। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा येथील आरएएफचे जवान अशोककुमार सिंह (36) आरएएफ कॅम्पमध्ये सायंकाळी 6 वाजता मोटारसायकलवरुन ड्युटीवर चालले होते. यावेळी आरएएफ कॅम्प समोरील चौकात सिग्नल लागल्याने अशोककुमार थांबले होते.
मात्र, त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या टाटा अल्टरोज या कार चालकाने अशोककुमार यांना रस्ता सोडण्याचा इशारा देण्यासाठी आपल्या कारचा वारंवार हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अशोककुमार यांनी कार चालकाला पुढे सिग्नल लागला असल्याचे बोलल्याने त्या कार चालकाला राग आला. त्यामुळे त्याने आपल्या कारमधून खाली उतरुन अशोककुमार यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली. त्यानंतर अशोककुमार यांनी त्या कार चालकाला चावी का काढली, अशी विचारणा करताच त्याने अशोककुमार यांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे जमलेल्या इतर लोकांनी अशोककुमार यांची सोडवणूक केल्यानंतर आरोपी कार चालकाने तेथून पलायन केले. या प्रकारानंतर अशोककुमार यांनी तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.