जुलैपर्यंत 70 कोटी 83 लाखांचे कर्ज 15 हजार 666 शेतकर्यांना लाभ
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांना यंदा 317 कोटी 91 लाख रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील 40 हजार 632 शेतकर्यांना खरीप कर्ज वाटप जाणायचे नियोजन कार्नाय्त आले होते. जुलैपर्यंत 24 हजार 667 सभासद शेतकर्यांना 173 कोटी 86 लाख रुपयांचे पीक कर्जाचा पुरवठा करण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 61 टक्के एवढे आहे. असणारे उद्दिष्ट गाठण्यात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सिंहाचा वाट उचलला आहे. यंदा देखील आरडीसीसी बँकेने कर्ज वाटपात अव्वल राहून आतापर्यंत 15 हजार 666 शेतकर्यांना कर्ज वाटप केले आहे.
खरीप हंगाम शेतकर्यांसाठी महत्त्वाचा असतो. जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षात खरीप हंगामाचे पिकाखालील सरासरी क्षेत्र 1 लाख 5 हजार 620 हेक्टर असून यंदा 4 हजार 989 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी खरिपाची भात, नागली, वरई, तूर, भाजीपाला आणि इतर पिकांची बियाणे आणि खत शेतकर्यांना मिळावी यासाठी शेतकर्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी 119 कोटी 27 लाख रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत व खासगी व्यापारी बँकांना 197 कोटी 74 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे रायगड जिल्ह्यातील 39 प्रकरच्या राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकाना 317 कोटी 91 लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकर्यांना बी-बियाणे, खते आणि शेतीसाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत शेतकर्यांना पीक कर्जाची नितांत गरज असते. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत खरीप पीक कर्जाचे वाटप सुरु असते. जून- 2023 अखेर खरीप पिक कर्ज वाटपाचे 100 टक्के उद्दिष्ट सर्व बँकांनी विशेषत: राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका यांनी पूर्ण साध्य करण्याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येतात. परंतु पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया 30 सप्टेंबर पर्यंत सुरु राहते. यंदा जुलै संपून ऑगस्टचा पहिला पंधरवडा संपत आला तरी पीक कर्ज वाटपाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. आत्तापर्यंत झालेले कर्जवाटपयात आतापर्यंत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 15 हजार 666 स्बाहसद शेतकर्यांना 70 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण 93 टक्के एवढे आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी 7 हजार 273 शेतकर्यांना 74 कोटी 99 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण 38 टक्के आहे. व्यापारी बँकांनी 1 हजार 724 शेतकर्यांना 28 कोटी 1 लाखांचे कर्ज वाटप केले असून याची टक्केवारी 37 टक्के आहे. असे मिळून जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील 24 हजार 667 सभासद शेतकर्यांना एकूण 173 कोटी 86 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण 61 टक्के एवढे आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेने दिली आहे.