। मुंबई । वृत्तसंस्था ।
आज म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. सलग तिसर्या दिवशी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रति लिटर 35-35 पैशांनी वाढवल्या आहेत. या आठवड्यात सोमवार-मंगळवारी इंधनाच्या किमती स्थिरावल्या होत्या. मात्र, बुधवारपासून दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एका महिन्यापासून तेल विपणन कंपन्या ह्या पेट्रोलच्या किमती वाढवत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत 24 वेळा पेट्रोलच्या दरात 7.45 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 25 वेळा वाढ झाली असून आतापर्यंत 8.75 रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत 17 टक्के वाढ झाली आहे.
प्रमुख महानगरातील आजचे दर..
मुंबई: पेट्रोल – 114.47 प्रति लीटर; डिझेल – 105.49 प्रति लीटर
दिल्ली: पेट्रोल – 108.64 प्रति लीटर; डिझेल – 97.37 प्रति लीटर
कोलकत्ता पेट्रोल – 109.12 प्रति लीटर; डिझेल – 100.49 प्रति लीटर
चेन्नई: पेट्रोल – 105.43 रुपये प्रति लीटर; डिझेल – 101.59 प्रति लीटर