आय.पी.एल. क्रिकेट लिग जगातील श्रींमत लिग असेलही मात्र या लिगने भारतीय क्रिकेटच्या गुणवत्तेला किती उंचावले याबाबत आता शंका वाटायला लागली आहे. ऑस्ट्रोलियातील ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताची कामगिरी या गोष्टीला पुरावा आहे. आपण विश्वविजेते होऊ शकू असे कोणत्याही क्षण वाटत नव्हते. अकरा जणांच्या संघाची निवड करतानाची अनिश्चितता स्थिर संघ कधीच देऊ शकली नाही. कप्तान रोहित शर्माचे कल्पनाशून्य नेतृत्व, प्रशिक्षक म्हणून राहूल द्रविडचे ज्येष्ठ क्रिकेटपटूंवरील नियंत्रणात आलेले अपयश. यामुळे विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत आपण अपयशी ठरलो. दुबळ्या संघांवरील विजयानंतर आपण स्वतःचीच दिशाभूल करून घेतली.
या अपयशामुळे दिनेश कार्तिक, रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंवर संक्रात येऊ शकते. मात्र चुकीच्या संघनिवडीचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. ॠषभ पंत हा तरूण यष्टीरक्षक असताना दिनेश कार्तिकवर वाजवीपेक्षा अधिक भरवसा दाखविला गेला. उपांत्य सामन्यातही आपला यष्टीरक्षक अखेरच्या क्षणापर्यंत निश्चित होऊ शकत नव्हता. पंतला अचानक एखाद-दुसर्या सामन्यात संधी देऊन आपण काय साध्य केले? इंग्लंडविरूद्ध सामन्यात पंतला फलंदाजीसाठी अवघी 2 षटकेच मिळाली होती. अब्दुल रशीद भारतीय संघाला जखडून ठेवीत असताना सूर्याच्या ऐवजी डावखुर्या पंतला पाठविण्याची कल्पकता आपण दाखवायला हवी होती. सुर्यकुमारचा फॉर्म किंचित मागे ठेऊन परिस्थितीनुसार डावपेच आखणे गरजेचे होते. भारताने 42 चेंडू निर्धाव खेळून काल याचा अर्थ 7 षटके निर्धाव फलंदाजी केली. याचाच अर्थ भारतीय संघाने 20 षटकांच्या सामन्यात मात्र 13 षटकेच फलंदाजी केली. हार्दिक पंड्यांच्या आक्रमणामुळे आपण 168 धावसंख्येपर्यंत तरी पोहोचलो.
मात्र क्षेत्र रक्षणातही कप्तान रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला. जसे पॉवरप्लेमध्ये आपण 40 धावसंख्या एकदाच ओलांडू शकतो. मात्र इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये 64 धावा फटकाविल्यानंतरही रोहितने डावपेचात नाविन्य आणण्याचा प्रयत्नही केला नाही. सारं काही आधी ठरल्यानुसार चाललं होतं. बटलरने गुडलेंग्थवरील चेंडूही मागे खेळून एकेरी धावा काढल्या. त्यावेळी चेंडूचा टप्पा मागे ठेऊन मिडऑफ मिडऑनवर क्षेत्ररक्षक ठेऊन बटलरला आजमावता आले असते.
राहुल द्रविडचा सिनिअर खेळाडूंना नियंत्रण ठेवण्याचा पिंड नाही. ज्युनिअर खेळांडूकडून तो चांगले काम करून घेऊ शकतो. सिनीअर व मोठ्या खेळांडूवर त्याचा वचक नाही. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून संघावर त्याची पकड नाही. कप्तान स्ट्रीट स्मार्ट नसेल तर या संघाचे कॉम्बीनेशन फार काल यशस्वी ठरणारे नाही. कारण दोघही नेमक्या कोणत्या खेळाडूंला कोणत्या प्रतिस्पर्धांसमोर खेळवायचो आणि कोणत्या मैदानावर कोणत्या खेळाडू उपयुक्त ठरू शकतो याचीही जाण नसणे आणि समन्वयाचा अभाव हे देखील भारताच्या पराभवाचे कारण आहे.
इंग्लंडने भारतीय फलंदाजांचा अभ्यास केला व रशिद व लिविंजस्टोनचा अचूक वापर केला. जो खेळही भारतीयांसाठी आदर्श होतो. कोरडी फिरकीला पोषक त्याचा फायदा इंग्लंडने उठविला. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी भारताचा कप्तान डावपेच लढविण्यात थिटा पडला.