रायगड जिल्ह्यात एका नवीन कोरोना रूग्णाची नोंद; 6 कोरोनामुक्त, 68 रुग्णांवर उपचार सुरू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शुक्रवार दि. 20 मे रोजी पनवेल मनपा हद्दीत एकच नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 6 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 68 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आज पनवेल मनपा हद्दीत एक नवीन रूग्ण आढळला तर पनवेल मनपा हद्दीतीलच 6 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 437 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 671 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर थांबला आहे. सद्यस्थितीत 68 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version