आठवडाभरात दोन कोटींची वसूली

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

मार्च संपत आला तरी अजूनही महावितरणची थकबाकी मोठी आहे. थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही वसुली न झाल्याने महावितरणने कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यात 1 हजार 315 ग्राहकांची जोडणी तोडण्यात आली आहे. या ग्राहकांना पुढील 6 महिने कंपनी वीज जोडणी देणार नाही. त्यानंतर त्या ग्राहकांना नवीन जोडणीसाठीच अर्ज करावा लागणार आहे. 395 ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरती तोडण्यात आली आहे. बील भरल्यानंतर त्यांना पुन्हा वीज जोडून दिली जाणार आहे.

कारवाईच्या भितीने आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे 2 कोटीची थकबाकी वसूल झाली आहे. 15 कोटी 62 लाखावरून आता 13 कोटी 92 लाख एवढी थकबाकी शिल्लक आहे. आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील 45 हजार 321 ग्राहकांकडे 15 कोटी 62 लाखाची थकबाकी होती. आज 27 हजार 379 ग्राहकांकडे 13 कोटी 92 लाख रुपये थकित आहेत.

जिल्ह्यातील थकबाकीदार
 -ग्राहक-थकबाकी
घरगुती - 16 हजार 286 - 1 कोटी 22 हजार
वाणिज्य - 1 हजार 624 - 57 लाख
औद्योगिक - 291 - 62 लाख
कृषी - 5 हजार 827 - 2 कोटी 39 लाख
इतर कृषी - 42 - 7 लाख
पथदीप - 1 हजार 435 - 6 कोटी 63 लाख
पाणी पुरवठा - 624 - 1 कोटी 59
सरकारी - 1 हजार 132 - 83 लाख
Exit mobile version